डोंगरी परिसरातील ९ अनधिकृत दुकानांवर ‘बी’ विभागाकडून निष्कासनाची कारवाई
डोंगरी परिसरातील ९ अनधिकृत दुकानांवर ‘बी’ विभागाकडून निष्कासनाची कारवाई
मुंबई - ‘बी’ विभागा अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरातील ९ अनधिकृत दुकाने, अनधिकृत वाहन पार्किंगकरिता रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक तसेच इतर अतिक्रमणांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ विभागाकडून नुकतीच निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
‘बी’ विभागातील वल्लभभाई पटेल मार्ग आणि डोंगरी परिसरात अनधिकृत दुकाने आणि पदपथावर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन या विभागांनी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान, ९ अनधिकृत दुकाने, पदपथावरील अतिक्रमण, दुकानांचे अनधिकृत वाढीव बांधकाम, अनधिकृत वाहन पार्किंगकरिता रस्त्यावर लावलेले लोखंडी खांब, दुकानांचे अनधिकृत नामफलक हटविण्यात आले. दरम्यान, परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
‘बी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन, अनुज्ञापन व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. डोंगरी पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर