शेतकरी महिलेने सुरू केली आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी
शेतकरी महिलेने सुरू केली आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी
अहिल्यानगर-: अहिल्यानगर जिल्ह्यातील राजश्री गागरे यांनी शेतकरी महिला ते जर्मन कंपनीची मालकीण होण्याचा मान त्यांनी मिळवून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची ही कंपनी आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी आहे. राजश्री गागरे यांचे शिक्षण इंजिनिअरिंग झालेले असून त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच विवाह झाला. लग्नानंतर त्यांच्या पतीची नोकरी गेली आणि घर चालवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यानंतर राजश्री यांनी शेती करायला सुरुवात केली. यामध्ये गाईंच्या धारा काढणे, शेतामध्ये खुरपणी करणे, कापूस वेचणे ही कामे त्यांनी केली. जवळपास चार वर्षे त्यांनी शेतामध्ये काम केले. त्यानंतर राजश्रींना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं, त्यामुळे त्यांनी पुण्यात येताच लहान-मोठ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली.
दरम्यान राजश्री यांना एक मोठी संधी चालून आणि त्यांनी त्याचे सोने केले. 2010 साली त्यांनी बुडीत झाल्यामुळे विक्रीस निघालेली जर्मन विकत घेतली. मोठ्या कष्टाने त्यांनी ही कंपनी पुन्हा उभी केली. ही कंपनी आता आशियातील पहिली चुंबक बनवणारी जर्मन कंपनी आहे. मग्नाप्लास्त टेक्नोलॉजी कंपनीत सध्या सुमारे 120 पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 25 कोटींपेक्षा जास्त आहे.
राजश्री यांनी महिलांसाठी त्यांनी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अनेक उद्योजिका घडवल्या आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये जे.आर.डी. टाटा उद्योग सखी पुरस्कार, द प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant