‘पहलगाम’ हल्ल्याचा धाक दाखवत 82 वर्षीय वृद्ध महिलेला ‘डिजिटल अरेस्ट
‘पहलगाम’ हल्ल्याचा धाक दाखवत 82 वर्षीय वृद्ध महिलेला ‘डिजिटल अरेस्ट
मुंबई-: कल्याणमध्ये एका 82 वर्षीय सेवानिवृत्त आजींना चक्क पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा खोटा धाक दाखवून 73 लाख 30 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कुलकर्णी या 82 वर्षीय आजींना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला तपास अधिकारी असल्याचे भासवले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले असून, त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक सापडला आहे, असा बनाव भामट्यांनी केला. आजींना घाबरवून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ खाली असल्याचे सांगण्यात आले. पुढील पाच दिवस त्यांना कोणाशीही बोलू न देता सतत फोनवर ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला.
बँक खात्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगून आरोपींनी आजींना विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आजींनी त्यांच्या निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे आणि काही रक्कम ओळखीच्या लोकांकडून उसने घेऊन भामट्यांच्या खात्यात जमा केली. 5 दिवसांनंतर जेव्हा त्यांना संशय आला आणि त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, ज्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, त्यांचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant