मध्य रेल्वे मार्गावर लवकरच बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन
मध्य रेल्वे मार्गावर लवकरच बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन
मुंबई - देशातील पहिली नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल लवकरच मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होते मात्र आता चेन्नई कोच फॅक्टरीमधून निघाली असून एप्रिल अखेरीस मुंबईत दाखल होईल. त्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
वैशिष्ट्ये
ही रेल्वे 12 कोचची आहे. या लोकलचा क्रमांक 268201-268212 असा आहे. हा भारतीय रेल्वेतील एक खास प्रोटोटाईप आहे. चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये (ICF) या ट्रेनचे खास डिझाईन तयार करण्यात आले आहे. ही एक वेस्टिब्युल ट्रेन आहे. त्यामध्ये सहा सहा डब्बे असतील. सहा डब्ब्यांचे दोन युनिट आहेत. एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात जाता येईल. महिलांसाठी आरक्षित डब्बे असतील. या रेल्वेत कोणताही फर्स्ट क्लास डब्बा नसेल. या बंद दरवाज्याच्या नॉन एसी रेल्वेमुळे सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे. कुणालाही दरवाजात लटकता येणार नाही.
अत्यंत गर्दीच्या वेळी ही नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल धावेल. या लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बंद करण्याची सिस्टिम आहे. यामध्ये सेन्सर, टॉकबॅक, प्रवाशांसाठी स्टेशनची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड असेल. तर डब्ब्यात कार्बन डायऑक्साईड जमा होऊ नये यासाठी खास सुविधा आणि सोय करण्यात आली आहे.
हवा खेळती राहणार
सर्वात मोठे आव्हान हे या डब्ब्यातील हवा येण्याविषयीचे आहे. पण या नॉन एसी डब्ब्यांच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स लावण्यात आले आहे. छतावर ब्लोअर्स लावण्यात आले आहेत. त्यातून सातत्याने ताजी हवा येत राहील आणि प्रवाशांना दमटपणाचा त्रास होणार नाही
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर