इंस्टाग्रामची पेड आवृत्ती, इंस्टाग्राम प्लस
इंस्टाग्रामची पेड आवृत्ती, इंस्टाग्राम प्लस
ट्रेण्डिंग
मुंबई - इंस्टाग्रामची पेड आवृत्ती Instagram Plus चे सध्या टेस्टिंग सूरू आहे. यात खास करून स्टोरीजसाठी प्रायव्हसी कंट्रोल्स, अॅडव्हान्स्ड इनसाइट्स आणि अनॉनिमस व्ह्यूइंग सारखे फीचर्स दिले जात आहेत. हे सब्स्क्रिप्शन सामान्य वापरकर्त्यांसाठी आहे, क्रिएटर्ससाठी नव्हे. एप्रिल 2026 पासून Meta ने मर्यादित प्रमाणात टेस्टिंग सुरू केले आहे. सामान्य वापरकर्ते ज्यांना अधिक प्रायव्हसी, कंट्रोल आणि एंगेजमेंट हवे आहे त्यांच्यासाठी हे अद्ययावत आवृत्ती उपयोगी ठरणार आहे. अद्याप याची अधिकृत सब्स्क्रिप्शन फी जाहीर नाही, पण भारतात मासिक शुल्क आकारले जाण्याची शक्यता.
मुख्य फीचर्स:
अनॉनिमस स्टोरी व्ह्यूइंग: वापरकर्ते इतरांची स्टोरी पाहू शकतात, पण त्यांचे नाव व्ह्यूअर लिस्टमध्ये दिसणार नाही.
स्टोरी इनसाइट्स: कोण किती वेळा स्टोरी पुन्हा पाहतो, व्ह्यूअर सर्च, आणि विस्तारित कंट्रोल्स.
फोटो/व्हिडिओ कंट्रोल्स: डबल-टॅपने झूम, ड्रॅग करून नेव्हिगेशन, इमेज डाउनलोड किंवा URL कॉपी करण्याची सुविधा.
डिफॉल्ट साउंड प्ले: व्हिडिओ आपोआप आवाजासह सुरू होतात.
प्रायव्हसी टूल्स: स्टोरीज आणि प्रोफाइलवर अधिक कंट्रोल
फायदे :
प्रायव्हसी वाढ: अनॉनिमस स्टोरी व्ह्यूइंगमुळे वापरकर्त्यांना इतरांचे कंटेंट पाहताना गुप्तता राखता येते.
एंगेजमेंट कंट्रोल: स्टोरी इनसाइट्समुळे कोणते कंटेंट जास्त लोकप्रिय आहे हे समजते, त्यामुळे वापरकर्ते आपला वापर अधिक स्मार्ट करू शकतात.
सोयीस्कर वापर: फोटो झूम, व्हिडिओ डिफॉल्ट साउंड यामुळे अॅप अधिक युजर-फ्रेंडली होते.
कंटेंट मॅनेजमेंट: इमेज डाउनलोड/URL कॉपीमुळे कंटेंट सेव्ह करणे किंवा शेअर करणे सोपे होते.
जाहिरातींपासून स्वातंत्र्य: पेड आवृत्ती असल्याने जाहिराती कमी किंवा पूर्णपणे हटवल्या जाण्याची शक्यता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant