गोकुळ दूध संघाची होणार चौकशी
गोकुळ दूध संघाची होणार चौकशी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची चौकशी होणार आहे. पुणे विभागाच्या विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थांकडून या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक तोंडावर असतानाच हा निर्णय झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. गोकुळच्या मतदार यादीतील तब्बल 1108 संस्थांवर आक्षेप नोंदवण्यात आला असून, त्यापैकी 427 संस्थांच्या नोंदणी आणि सभासदत्वाची चौकशी केली जाणार आहे. वडकशिवाले येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी या संस्थांना सभासद करताना नियम डावलल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ही चौकशी नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचा दावा गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केला असून, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर