जागतिक जलदिन 2026 कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जागतिक जलदिन 2026 कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बई --म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने *जागतिक जलदिन 2026 निमित्त विशेष कार्यक्रम जुहू येथील हॉटेल रामाडा प्लाझा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये पाणी कसं मौल्यवान आहे याबद्दल विविध नामवंतांनी आपले विचार प्रगट केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू उपस्थित होते. त्यांनी महापालिकेतील अभियंत्यांना मार्गदर्शन करताना स्वयंपूर्ण विकास व स्वयंविकास या विषयांवर सखोल विचार मांडले.
यावेळी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 120 एकर क्षेत्रावर प्रस्तावित अभियंता टाऊनशिप प्रकल्प याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पामध्ये नियोजनबद्ध पायाभूत सुविधा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध संस्थांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या मांडणीमुळे उपस्थित अभियंते व सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
जलसंवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात उपलब्ध असलेल्या खोल पाणीसाठ्यांचा सखोल अभ्यास करून त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यासाठी दृढ इच्छाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमामध्ये आर्किटेक्ट गोपाळ झवेरी व माजी उप प्रमुख अभियंता अजित साळवी यांनी विविध विषयांवर, विशेषतः मुंबईच्या पाणी व्यवस्थापनासंदर्भात सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश भुतेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी “अभियंता मित्र, पुणे” यांच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुंबई वॉटर या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रशेखर प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष टि. व्हि. शाह व कार्याध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख यांनी उपस्थित सर्व मान्यवर व अभियंते यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला महापालिकेतील मोठ्या संख्येने अभियंते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant