देशातील १४ शहरांमध्ये केलेल्या जीवनशैली आणि पचन आरोग्य जागरूकता सर्वेक्षणातून समोर आलाधक्कादायक निष्कर्ष.
देशातील १४ शहरांमध्ये केलेल्या जीवनशैली आणि पचन आरोग्य जागरूकता सर्वेक्षणातून समोर आलाधक्कादायक निष्कर्ष.
मुंबई - धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्थेशी संबंधितसमस्या झपाट्याने वाढत आहेत . पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कॅन्सर सारख्या गंभीरआजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.
लोकं पचनासंबंधी तक्रारी कोणत्या प्रकारे हाताळतात आणि वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी ते किती वेळ घेतात हेसमजून घेण्यासाठी मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेडने जीवनशैली आणि पचन आरोग्य जागरूकतासर्वेक्षणाच्या अंतर्गत देशभरात एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात अनियमित शौचाच्या तक्रारी, अॅसिडिटी, शौचावाटे रक्त येणे यांसारख्या लक्षणांवर लोकं कशी प्रतिक्रिया देतात, तसेच या तक्रारीनंतरहीडॉक्टरांकडे जाण्यास होणारा बिलंब व त्यामुळे निदानास होणारा विलंब आणि जागरूकतेचा अभाव यामागीलत्यांच्या वर्तणुकीच्या तसेच सवयीचा अभ्यास करण्यात आला.
या सर्वेक्षणाचा निकाल एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या परिषदेला अपोलो हॉस्पिटल्स, नवीमुंबई येथील वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी;एस. एल. रहेजाहॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई येथीलवैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुबारकुन्निसा टोंसे; सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीयऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह उपस्थित होते. त्यांनी पचनासंबंधी लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तसेचवेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी अधिक जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे अधोरेखित केले.
भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर हा आरोग्याचा धोका ठरत आहे. यामागे चुकीच्या खाण्याच्या सवयी, लठ्ठपणाआणि पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल असलेला जागरूकतेचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. हा कॅन्सर वेळीचओळखल्यास त्यावर उपचाराने मात करता येऊ शकते. मात्र, अनेक वेळा लक्षणांची पुरेशी माहिती नसल्यामुळेआणि तपासणीस विलंब झाल्यामुळे या आजाराचे उशिराने निदान होते.
दरवर्षी मार्च महिना ‘कोलोरेक्टल कॅन्सर जागरूकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवरकरण्यात आलेल्या देशभरातील या सर्वेक्षणातून पचनाच्या आरोग्याबाबतच असलेला जागरूकतेचा अभावआणि चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींबाबत चिंताजनक बाबी समोर आल्या.
या सर्वेक्षणात देशभरातील २५ ते ६५ वयोगटातील १०,१९८ व्यक्तींचा सहभाग होता. कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू, कलिकत, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदौर, जयपूर, कोची, कँलिकट, लखनऊ, मुंबई आणि पुणे या १४ मोठ्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणातून पचनासंबंधी सवयी आणि जागरूकतेबाबत काही चिंताजनक गोष्टी समोर आल्या. ८०%पेक्षा जास्त लोक अॅसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेतास्वमर्जीने औषधं घेतात. ६५% पेक्षा जास्त लोकांना शौचाच्या सवयी अनियमित असल्याचा अनुभव आलाआहे. तंबाखू सेवनकरणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे पचनसंस्थेसंबंधी आजारांचा आणि कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळेलक्षणांबाबत जागरूकता वाढवणे, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि नियमित तपासणी करणे गरजेचेआहे.
सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह यांनी बदलत्याजीवनशैलीवर भर देत सांगितले की, कोलोरेक्टल कॅन्सर वाढण्यामागे जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. वारंवारप्रोसेस्ड फुड किंवा बाहेरचे अन्नपदार्थ खाणे, व्यायामाचा अभाव, तंबाखू सेवन आणि लठ्ठपणा हे सर्व पोटाच्यासमस्यांचा धोका वाढवतात. यासाठी फायबरयुक्त आहाराची निवड करणे, नियमित व्यायाम करणे, तंबाखूचेसेवन टाळणे आणि वेळोवेळी तपासणी करणे या सवयी अंगीकारल्यास हा धोका कमी करता येतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant