मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात
मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात
मुंबई :श्री स्वामी समर्थ महाराज मठ गंगा नगर मिरागाव मिरारोड पुर्व येथे प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वामी समर्थ महाराज मठात येऊन दर्शन तिर्थप्रसादाचा लाभ घेतला. तसेच त्यांनी महाप्रसाद वाढून लोकांची सेवा केली. त्यांनी सर्व सेवेकरी समिती सदस्यांसोबत चर्चा करून मठाच्या कामकाजाची माहिती घेतली. मठात सकाळ पासून भक्तांनी गर्दी केली होती, स्वामी समर्थ महाराज पालखी मिरवणूक मिरा गाव प्लेझटं पार्क कृष्णा स्थळ परिसरात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली, सायं महाआरती ला तुफान गर्दीने परिसर दणाणून गेला.
भजन कार्यक्रमांत प्रकट दिन उत्सव साजरा झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गजानन नागे, सचिव श्रीरंग परब, मठातील सेवेकरी सौ स्वप्नीली जेठे, रवि कोलबेकर, अवधुत उमरोटकर, संजय सावंत, इतर सर्व पदाधिकार्यांनी व महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले. यावेळेस जिल्हा प्रमुख राजु भोईर नगरसेवक अनिल सावंत, नगरसेवक नवीन सिंग, नगरसेविका सौ. कांबळी, जिल्हा अध्यक्ष काॅगेस पक्ष श्री प्रमोद सामंत , दिलीप भोईर,इतर मान्यवर सहकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant