सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट
सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट
मुंबई - आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेल्या शक्तीने धर्मांतरण विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याचे पहायला मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला, तर काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या विधेयकाला विरोध केल्याचे चित्र सभागृहात दिसून आले.
सक्तीने धर्मांतरण विरोधी विधेयक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले, त्यांनी विधेयकाची मागील भूमिका देखील स्पष्ट केली. यानंतर विरोधी सदस्यांनी आपापली मते मांडली. त्यात शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधेयकाचे स्वागत करताना त्यातील काही तरतुदींचा विचार करावा अशी मागणी केली, मात्र या विधेयकाला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. याउलट काँग्रेस पक्षाच्या वतीने असलम शेख यांनी विरोध करत हे विधेयक एका पक्षाला लक्ष करण्यासाठी आणण्यात आले असून या विधेयकाबाबत सत्ताधारी पक्षाचे नेते बाहेर उलट सुलट वक्तव्य करीत आहेत असा आरोप केला. समाजवादी पक्षाचे सदस्य रईस शेख यांनी देखील या विधेयकाला विरोध केला. केवळ एक धर्माला टार्गेट करून हे विधेयक आणण्यात आले आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी हा घटनेवर हल्ला असून घटनेने धर्म स्वातंत्र्य दिलेले असताना अशा विधेयकाची गरज काय? हे विधेयक म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे असा आरोप करत या विधेयकाला विरोध केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर