LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ
LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ
मुंबई - युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती वापरासाठीच्या LPG सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच सरकारने सिलिंडर बुक करण्याची मर्यादा वाढवल्याने त्रस्त झालेले नागरिक आता इंधनाचे पर्यांयी मार्ग शोधत आहेत. यामुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ झाली असून या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले आहेत.
इंडक्शन कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५% वाढ झाली आहे. या कंपन्यांमध्ये टीटीके प्रेस्टीज, गांधी माथी अप्लायन्सेस आणि स्टोव्हक्राफ्ट यांचा समावेश आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनुसार, गेल्या काही दिवसांत इंडक्शनच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ॲमेझॉनवर विक्री सुमारे ३० पट आणि फ्लिपकार्टवर विक्री सुमारे चार पट झाली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक केटल, राइस कुकर आणि इतर इलेक्ट्रिक कुकिंग उपकरणांची विक्रीही वेगाने वाढत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाच्या मते, गेल्या काही दिवसांत इंडक्शन कुकटॉपची मागणी सुमारे ३ पटीने वाढली आहे. तर, किचन अप्लायन्सेस बनवणाऱ्या स्टोव्हक्राफ्ट कंपनीने सांगितले की, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची साप्ताहिक विक्री सुमारे चार पटीने वाढली आहे.
एलपीजी संकटामुळे इंडक्शन स्टोव्हची विक्री ६०% ते ३००% वाढली आहे. रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक स्वयंपाकघरांमधून मागणीत मोठी वाढ झाली आहे. अनेक घरगुती ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्वयंपाकाचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, निवडक कंपन्यांचे इंडक्शन स्टोव्ह, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे वेगाने विक्री होत आहेत.
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर इंडक्शनची मागणी अचानक वाढली आहे. अनेक ई-कॉमर्स साइट्सवर हे उत्पादन ‘आउट ऑफ स्टॉक’ झाले आहे.
अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ब्लिंकिटसारख्या प्लॅटफॉर्मवर इंडक्शनच्या स्टॉकमध्ये लक्षणीय घट दिसून येत आहे. ब्लिंकिटवर तर जवळपास सर्वच मॉडेल्स ‘आउट ऑफ स्टॉक’ दिसत आहेत, तर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही काहीच ब्रँड्स उपलब्ध आहेत.
टीटीके प्रेस्टीज भारतातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघरातील उपकरणांच्या ब्रँडपैकी एक आहे. ते प्रेशर कुकर, कुकवेअर, गॅस स्टोव्ह आणि इंडक्शन कुकटॉप्स बनवते. एलपीजी संकटामुळे त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ७,३३१ कोटी रुपये बाजार भांडवल असलेल्या या कंपनीची सध्याची शेअर किंमत ५७६.३५ रुपये आहे. या Shares मध्ये १२ मार्च रोजी १४.५८% वाढ झाली.
बटरफ्लाय ब्रँड म्हणून ओळखले जाणारे गांधीमथी अप्लायन्सेस दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. सध्याची शेअर किंमत ६९८ रुपये आहे. शेअर्स एका दिवसात १०.५७% ने वाढला आहे. कंपनीेचे मार्केट कॅप १,२४३ कोटी रुपये आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर