उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते बोपोडीत कॅन्सर निदान व HPV लसीकरण शिबिराचे उद्घाटन
उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते बोपोडीत कॅन्सर निदान व HPV लसीकरण शिबिराचे उद्घाटन
पुणे - महिलांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने कॅन्सरचे लवकर निदान आणि सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) बोपोडी येथील कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर प्रसूतीगृह व रुग्णालयात महिलांसाठी विशेष कॅन्सर निदान, सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक (HPV) लसीकरण व समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोऱाडे, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, वैद्यकीय अधिकारी (WHO) डॉ. चेतन खाडे, लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद मखर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंधळे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणेश बागडे, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, आशा सेविका तसेच लाभार्थी महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोऱाडे यांनी सर्वायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी HPV लसीकरणाचे वैद्यकीय आणि तांत्रिक महत्त्व सविस्तर स्पष्ट केले. समाजामध्ये पसरत असलेल्या गैरसमजुती दूर करून पालकांनी योग्य माहितीच्या आधारे आपल्या मुलींना HPV लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य माहिती घेऊन मुलींना HPV लसीकरण करून घेण्याचे पालकांना आवाहन केले. महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पुणे महानगरपालिका आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खेडेकर रुग्णालय व शेवाळे रुग्णालय येथे अधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नव्याने उभारण्यात आलेल्या संजय गांधी इमारतीमध्ये महानगरपालिकेमार्फत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या धर्तीवर विविध आरोग्य सुविधा विकसित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले. आवश्यकतेनुसार विविध संस्थांच्या CSR निधीच्या माध्यमातून आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये पात्र वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरण करण्यात आले, तसेच महिलांसाठी तोंड, स्तन आणि गर्भाशय मुख (Oral, Breast आणि Cervical) कॅन्सरचे प्राथमिक परीक्षण करण्यात आले. याशिवाय नाव नोंदणी, उंची-वजन व BMI मोजमाप, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील साखर तपासणी (BSL-R), ABHA व PMJAY कार्ड नोंदणी तसेच रक्तक्षय व जीवनसत्वांची औषधे वितरण यासारख्या विविध आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant