श्री गणेश आखाड्याचे चार पहलवान महाराष्ट्र केसरी खेळणार
श्री गणेश आखाड्याचे चार पहलवान महाराष्ट्र केसरी खेळणार
क्रीडा
ठाणे - अठरा फेब्रुवारी रोजी सरवली ता.भिवंडी या गावी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने तथा ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी आणि प्रौढ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेकरिता निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील ४ पैलवानांनी प्रेक्षणीय कुस्ती करत प्रथम प्रथम क्रमांक पटकाविला.
१. पै.गणेश शिंदे ७४ किलो माती विभागात प्रथम गणेश ची फायनल कुस्ती मंथन पाटील कोनगाव सोबत झाली या कुस्ती मध्ये गणेश ने १२-०२ अशा गुणांनी सामना जिंकला.
२. पै.सूरज माने ७९ किलो गादी विभाग प्रथम या मध्ये सूरज चा मुकाबला प्रणय पाटील जूनांदुरखी सोबत झाला या मध्ये एकतर्फी विजय संपादन करत १० गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावी केला.
३. पै.सूर्यकांत देसाई ८६ किलो गादी विभाग प्रथम या मध्ये सूर्यकांत ची फायनल ची लढत निखिल पाटील सोबत झाली या मध्ये देखील सूर्यकांत ने आपले वर्चस्व सिद्धकरत सामना १०-० ने जिंकला.
४. पै.विशाल जाधव ९२ किलो गादी विभाग प्रथम या मध्ये विशाल रोशन कराळे कोनगाव सोबत झाली यात देखील विशाल ने १०-० अशा गुणांच्या बाढतीत सामना जिंकत आपली दावेदारी सिद्ध केली.
वरील चारही पाहलवानांनी प्रतिस्पर्ध्यांवर १० गुणांच्या फरकाने म्हणजेच तांत्रिक चीतपटी ने विजय मिळवत आपली निवड १८ ते २२ मार्च रोजी वाघोली जि.पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता करून घेतली. सर्वांना आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील व कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर