NCERT पुस्तकात ‘मराठा साम्राज्या’ वर स्वतंत्र पाठ
NCERT पुस्तकात ‘मराठा साम्राज्या’ वर स्वतंत्र पाठ
नवी दिल्ली - आजवर मराठा साम्राज्याच्या इतिहासाला एखाद-दुसऱ्या परिच्छेदात संपवून टाकणाऱ्या NCERT ने आता आपल्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासावर एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे. इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरा धडा ‘मराठा साम्राज्याचा उदय’ या विषयावर आधारित असणार आहे.
या धड्यात मराठा साम्राज्याची ‘अटक ते कटक’ आणि ‘पेशावर ते तंजावरपर्यंतची’ व्याप्ती दर्शविणारा नकाशा छापण्यात आला होता. मात्र या नकाशावर जैसलमेर घराण्याचे वंशज चैतन्यराज सिंह यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या आक्षेपानंतर हिंदी आवृत्तीतील पुस्तकातून संबंधित नकाशा वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इंग्रजी आवृत्तीत मात्र हा नकाशा कायम ठेवण्यात आल्याने या निर्णयाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant