मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार e-vitaraलाँच
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार e-vitaraलाँच
मुंबई - Maruti Suzuki ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ई-विटारा 49kWh आणि 61kWh च्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह आली आहे. कंपनीचा दावा आहे की, कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपेक्षा जास्त धावते.
इलेक्ट्रिक SUV मध्ये 360 डिग्री कॅमेरा, एअरबॅग आणि लेव्हल-2 ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टिम (ADAS) सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹10.99 लाख ठेवण्यात आली आहे, परंतु यात बॅटरीची किंमत समाविष्ट नाही.
ग्राहकांना बॅटरीसाठी ‘बॅटरी-एज-ए-सर्व्हिस’ (BaaS) कार्यक्रमांतर्गत प्रति किलोमीटर ₹3.99 भाडे द्यावे लागेल. कंपनीने सध्या 49kWh बॅटरी पॅक असलेल्या बेस ‘डेल्टा’ व्हेरिएंटची किंमत जाहीर केली आहे, संपूर्ण किंमत सूची नंतर प्रसिद्ध केली जाईल.
कार डेल्टा, झेटा आणि अल्फा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. कारची बुकिंग 21 हजार रुपयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यासोबतच तिची डिलिव्हरीही सुरू झाली आहे. ही कार बाजारात ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि टाटा कर्व्ह EV सारख्या गाड्यांना टक्कर देईल.
बॅटरी पॅकवर 8 वर्षे किंवा 1,60,000 किलोमीटरपर्यंतची आणि गाडीवर 3 वर्षांची वॉरंटी मिळेल. गाडीची वॉरंटी 5 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. यासोबतच घरी चार्जर बसवण्याची सुविधा मोफत दिली जाईल. तसेच, मारुतीच्या ‘e for me’ ॲपद्वारे एक वर्षापर्यंत मोफत चार्जिंगची सुविधाही मिळेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर