मुंबईच्या मुष्टीयोद्ध्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सुवर्ण’ भरारी
मुंबईच्या मुष्टीयोद्ध्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सुवर्ण’ भरारी
मुंबई - दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे पार पडलेल्या ‘५व्या इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग कप २०२६’ मध्ये मुंबईच्या संघाने आपला दबदबा निर्माण करत जगज्जेत्यांना धूळ चारली आहे. पोलंड, कझाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त यांसारख्या बलाढ्य देशांच्या खेळाडूंना कडवी झुंज देत मुंबईच्या मुष्टीयोद्ध्यांनी एकूण ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची लयलूट केली आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील कसलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, मुंबईच्या खेळाडूंनी कठोर सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पॉइंट फाईट, के-वन आणि क्रिएटिव्ह फॉर्म अशा विविध प्रकारांत उत्कृष्ट प्रदर्शन करत पदकतालिकेत आपले
स्थान उंचावले. मुंबई संघाच्या या विजयामागे ‘स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन’ (मुंबई शहर) चे अध्यक्ष उमेश मुरकर आणि आंतरराष्ट्रीय रेफ्री विघ्नेश मुरकर यांचे दर्जेदार प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ‘गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट’ने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्याधुनिक प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे खेळाडूंना हे यश संपादित करणे सुलभ झाले.
महाराष्ट्र किकबॉक्सिंग
संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार व वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल यांनी सर्व विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेदरम्यान टीम कोच भूपेश वैती तसेच रेफरी आशिष महाडिक यांनीही आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या घवघवीत यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय
वैयक्तिक कामगिरीचा ठसा उमटवलेले खेळाडू :
सिद्धत गुप्ता : २ सुवर्ण पदके यथार्थ बुडमला : २ सुवर्ण पदके ग्रीशम पाटवर्धन : र सुवर्ण व १
रौप्य पदक
दुर्वा गावडे : १ सुवर्ण व १ रौप्य
पटक
सजीब रजिश : १ सुवर्ण व १
कांस्य पदक
विन्स पाटील : १ सुवर्ण व १
कांस्य पदक
आलोक ब्रीद, साहिल बापेरकर, अश्विनी जांबले आणि सय्यद अहमद यांनीही रौप्य व कांस्य पदके जिंकत मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
पातळीवर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant