भारतातील पहिला AI IPO
भारतातील पहिला AI IPO
मुंबई - बुद्धिमत्ता सोल्यूशन्स प्रदान करणारी कंपनी Fractal Analytic चा IPO ९ फेब्रुवारी रोजी उघडेल आणि ११ फेब्रुवारी रोजी बंद होईल.हा भारतातील पहिला एआय आयपीओ आहे. सबस्क्रिप्शनसाठी Fractal Analytics साठी किंमत पट्टा ८५७ ते ९०० रुपये प्रति शेअर असा निश्चित केला आहे. तर लॉट आकार १६ शेअर्स आहे. म्हणजेच गुंतवणूकदार किमान १६ शेअर्स किंवा त्यांच्या पटीत बोली लावू शकतात. सबस्क्रिप्शननंतर शेअर्सचे वाटप १२ फेब्रुवारी रोजी होईल. त्यानंतर शेअर्स १६ फेब्रुवारी रोजी सूचीबद्ध केले जातील. आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनली इंडिया, गोल्डमन सॅक्स इंडिया आणि अॅक्सिस कॅपिटल आहेत. तर एमयूएफजी इनटाइम इंडियाची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
फ्रॅक्टल अॅनालिटिक्सची स्थापना २००० मध्ये झाली. ती एक जागतिक एंटरप्राइझ एआय कंपनी बनली आहे. कंपनीच्या संपूर्ण एआय सेवा सप्टेंबर २०२५ पर्यंत दोन विभागांमध्ये विभागल्या आहेत. Fractal Analytics IPO द्वारे कंपनीचे एकूण २,८३३.९० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये १,०२३.५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्सची विक्री केली जाईल. तर ऑफर फाॅर सेल (ओएफएस) द्वारे १,८१०.४० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री होणार आहे. ओएफएसमध्ये शेअर्स विकणाऱ्या भागधारकांमध्ये क्विनॅग बिडको लिमिटेड, टीपीजी फेट होल्डिंग्ज प्रा. लि., जीएलएम फॅमिली ट्रस्ट, सत्य कुमारी रेमला आणि राव वेंकटेश्वर रेमला यांचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant