अमर क्रीडा मंडळचा दमदार विजय — जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले
!
मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद “पुरुष अ गट” निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अमर क्रीडा मंडळाने अंतिम विजेतेपद पटकावत शानदार यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात अमर क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, जबरदस्त बचाव आणि आक्रमक चढाया यांचे प्रभावी प्रदर्शन केले. कठोर सराव, शिस्तबद्ध नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
हा विजय केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित नसून, खेळाडूंच्या अथक मेहनतीची, समर्पणाची आणि चिकाटीची खरी पावती आहे. प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि समर्थक यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना संघप्रमुख नितीन विचारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
अमर क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडू व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, पुढील राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्येही अशीच दमदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant