गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार ..
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार ..
पुणे प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची जयंती यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे सिरत कमिटीने घेतला आहे. सुरत कमिटीच्या या निर्णयाचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वागत करत कमिटीचे आभार व्यक्त केले आहे.
आज पुणे पोलिस आयुक्त यांचे समवेत सिरत कमिटी पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे सोबत सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा , पोलिस उपायुक्त भाजीभाकरे व सिरत कमिटीचे मौलाना जमिरुद्दीन , रफिउद्दीन शेख, सिराज बागवान, असिफ शेख, जावेद खान, आबीद सय्यद, अन्सार पिंजारी, मौलाना खालिद निजामी इत्यादी उपस्थितीत होते. सिरत कमिटीच्या वतीने सकाळी ९ वाजता पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सदर मिरवणूक नाना पेठ येथील मनुशाह मस्जिद येथुन सुरु होवुन सिटी जामा मस्जिद येथे समारोप होईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant