लोकप्रिय वेबसिरिज ‘पंचायत’ चा सीझन 4 लवकरच होणार रिलिज
लोकप्रिय वेबसिरिज ‘पंचायत’ चा सीझन 4 लवकरच होणार रिलिज
मुंबई - दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय दिग्दर्शित ग्रामपंचायती भोवती फिरणारं लुटुपुटुचं राजकारण आणि गावातील साधे राहणीमान मांडणाऱ्या पंचायत या बेवसिरिजया मोठा चाहतावर्ग आहे. या सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या सीरिजला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘प्राइम व्हिडीओ’ने ‘पंचायत 4’ ची घोषणा केली आहे. ‘पंचायत 4’ येत्या 5 जुलैपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे.
या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन प्रदर्शित झाला, त्यालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. त्यानंतर गेल्या वर्षी तिसऱ्या सीझननेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंत आता चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. एका प्रोमोच्या माध्यमातून सोशल मीडियावर नवीन सीझनची घोषणा करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील फुलेरा नावाच्या काल्पनिक गावात घडणारी कथा यात दाखवण्यात आली आहे. मागील सीझनमध्ये ‘प्रधानजी’ यांना गोळी लागून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. तसेच,सचिव, विकास आणि प्रल्हाद यांचा विधायक भूषणशी वाद होतो. आता चौथ्या सीझनमध्ये पुढे काय घडणार? प्रधानजी वाचतील का? सचिवजी आणि रिंकीचं लग्न होईल का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे..
‘पंचायत ४’ मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे कलाकार दिसणार आहेत. ‘पंचायत ४’ ची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी केली आहे. तर चंदन कुमार यांनी कथा लिहिली आहे. तसेच दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya