बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू
बदलापूर: संपूर्ण देश खवळून निघालेल्या बदलापुरातील (Death of the accused in Badlapur Case) दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची (Accused Akshay Shinde Death) बातमी समोर आली आहे. बदलापुरातील (Badlapur Case) एका प्रसिद्ध शाळेत कर्मचाऱ्याचं काम करणारा अक्षय शिंदे याने शाळेतील चार वर्षांच्या चिमुरडींवर स्वच्छता गृहात लैंगिक शोषण केलं होतं. यानंतर बदलापुरातील नागरिकांनी शाळा आणि प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी अनेकांनी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.
बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे विरोधात पुरेसे पुरावे नव्हते. यासाठी एका एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवून घेतला होता.
दरम्यान या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय शिंदे याने तुरुंगात पोलिसांची बंदूक घेऊन गोळीबार केला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने तीन राऊंड फायर करीत स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. यात एक पोलीस जखमी झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE