कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मंडी लोकसेभच्या सदस्य कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट मोठा चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंचसोहळा नुकताच पार पडल्याचे पाहायला मिळाले होते. ६ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागू शकतो, असे स्पष्ट केले आहे.
मोहालीच्या स्थानिकांनी चित्रपटाला मिळालेल्या प्रमाणपत्राविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीसाठी शनिवारी केंद्र सरकार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल (ASG) सत्यपाल जैन यांनी हजेरी लावली होती. त्यांनी आपला पक्ष मांडताना स्पष्ट केले, “चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसून, ज्यांना या चित्रपटाबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे निवेदन द्यायचे आहे, ते देऊ शकतात. शीख समुदायासह सर्व समुदायांच्या भावना बोर्ड लक्षात घेईल, असे सत्यपाल जैन यांनी म्हटले. शनिवारी या प्रकरणाचा निकाल लागला.
सत्यपाल जैन यांनी सांगितले, ” ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीकडे एक अर्ज दाखल केला आहे, ज्यावर प्रक्रिया सुरू असून त्यावर अद्याप बोर्डाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की, अंतिम निर्णय घेताना आम्ही शीख समुदायासह सर्व समुदायांच्या भावना लक्षात ठेवू. सर्व सूचना आणि प्रतिनिधींचे स्वागत आहे”, असे सत्यपाल जैन यांनी म्हटले आहे.
सीबीएफसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील मुद्दा असल्याने या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यास आणखी वेळ लागू शकतो. ६ सप्टेंबर ही चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांनी तारीख जाहीर केली आहे, त्यापेक्षा वेळ होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले, “चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेशी आमचा काहीही संबंध नाही. चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्याआधीच चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे”, असे त्यांंनी म्हटले आहे.
शुक्रवारी कंगना रणौत यांनी “चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली होती, मात्र सीबीएफसीला धमकी मिळाल्याने चित्रपटाचे प्रमाणपत्र रोखण्यात आले”, असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी ६ सप्टेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार असून दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE