पनवेलच्या फार्महाऊस चालकांना पोलिसांच्या नोटीसा
चालक-मालकांच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या सूचना
पनवेल ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी नुकतीच फार्महाऊस चालक आणि मालक यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दौंडकर यांनी फार्महाऊस चालकांना दिल्या.
पनवेल तालुक्यातील फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट अगर शेतावर वेगवेगळया कार्यक्रमासाठी मालक आपली जागा भाडेतत्वावर देत असल्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाली. त्यामुळे पनवेलच्या फार्महाऊस चालकाना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. दौंडकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये फार्महाऊस चालकांना शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असून मुंबई, पुणे, ठाणे या सारख्या महानगराच्या नजीक असल्याने खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक हे रायगड जिल्हात येत असतात. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा निर्गमित केलेली आहे. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे अशा प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून वारंवार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेनुसार मनाई आदेश जारी करण्यात येत आहेत. पनवेल परिसरात फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट व शेतावर येणारे नागरीक कुटुबांसह, नातेवाईक, मित्रपरिवार हे जवळील पाण्याचे धरण, नदी व धबधबे येथील पाण्यात मद्यप्राशन करून जातात. तसेच डोंगर किल्ल्यांवर ट्रॅकिंगसाठी जात असतात. कोणाच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी फार्महाऊस, रिसॉर्ट, रेस्टॉरंट मालक चालकांनी घ्यावी असे पोलिसांनी बजावले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya