हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार
- by
- Sep 21, 2020
- 1338 views
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या व्यवसायिक संकेतस्थळाचे अनावरण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. पुढील काही दिवसांत हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्यावतीने पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. 1940 पासून ही संस्था हातकागद उत्पादनात अग्रेसर आहे. या संस्थेच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. ही सर्व उत्पादने आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने संस्था मोठ्या प्रमाणत लोकांपर्यत पोहोचेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. हातकागद संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकाराचे कागद, फाईल्स, पॅड कव्हर, डायरी, दिनदर्शिका, तयार केले जातात. या सर्व उत्पादनांना लोकांची मागणी वाढत आहे. याबाबत मंडळाने व्यावसायिक स्वरुपात www.punehandmadepapers.comहे संकेतस्थळ विकसित केले आहे.
या कार्यक्रमास उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलीमा केरकेट्टा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी, अन्बलगन आदि उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya