राष्ट्रभाव पुस्तक प्रकाशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रभाव पुस्तक प्रकाशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - महाखादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे लिखित ‘राष्ट्रभाव’ या पुस्तकाचे दादर येथील वसंत स्मृती येथे प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध स्वयंसेवकांनी आपले अनुभव आणि आपण केलेला त्यागाचा दाखला दिला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी सरकार्यवाह परम आदरणीय सुरेश (भय्याजी) जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या विचारांतून प्रकट झालेली राष्ट्रभक्ती, निष्ठा आणि कर्तव्यभावना प्रत्येकासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली.
‘राष्ट्रभाव’ हे पुस्तक केवळ शब्दांचे संकलन नसून, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची जाणीव जागवणारा एक अमूल्य ठेवा आहे. रवींद्र साठे जी यांनी मांडलेले विचार समाजमनात राष्ट्रभावना दृढ करण्यास नक्कीच प्रेरक ठरतील, असा विश्वास नगरसेवक आकाश पुरोहित यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ स्वयंसेवक व पद्मश्री दादा इदाते, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष,आमदार राहुल नार्वेकर, लेखक रवींद्र साठे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant