कोकणातील आंबा, काजुला नुकसानभरपाई देण्याची घोषणा
कोकणातील आंबा, काजुला नुकसानभरपाई देण्याची घोषणा
मुंबई - कोकणातील आंबा आणि काजू या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यांना यावेळी फळ पिक विमा आधारित नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली, याबाबत झालेल्या बैठकीनंतर प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही घोषणा त्यांनी केली. ज्या शेतकऱ्यांनी फळ पिक विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील हेक्टरी 22 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं .
नमो किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता आजच 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी इतका जमा करण्यात आला असून आजवर या पोटी 54 हजार कोटी जमा करण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील धानालाही बोनस दिला जाईल त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले . साखर उद्योगासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, त्यासोबतच कांदा पिकासाठी देखील निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र वगळता इतर ठिकाणची २०११ सालानंतरची सर्व निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant