लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ‘AI अंकीय ग्रंथालय’ भव्य उद्घाटनाने कार्यान्वित
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ‘AI अंकीय ग्रंथालय’ भव्य उद्घाटनाने कार्यान्वित
मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे भव्य उद्घाटन मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सर्वांसाठी विनामूल्य असलेल्या या ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षार्थींना आणि ज्ञानसाधकांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे.
या नूतन उपक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. अच्युत गोडबोले, संगणक तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका भारती पेडणेकर आणि नगरसेवक किरण तावडे उपस्थित होते. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे, मानद सचिव सुधीर सिताराम साळवी आणि खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शिक्षणाच्या वाढत्या महत्त्वावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजचे युग हे ज्ञान, संशोधन, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ग्रंथालयामुळे जागतिक ज्ञानसंपदेचे दालन खुले होईल, अभ्यास अधिक सुलभ आणि परिणामकारक बनेल, तसेच विद्यार्थ्यांना भविष्यकालीन संधींसाठी सक्षम करता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
हे AI अंकीय ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, संशोधनासाठी आणि कौशल्य विकासासाठी अत्याधुनिक सुविधा पुरविणार आहे. डिजिटल साधनसंपत्ती, ई-बुक्स, संशोधन साहित्य, अभ्यास मार्गदर्शक साधने आणि AI आधारित अध्ययन प्रणाली यामुळे हे ग्रंथालय ज्ञानसाधनेसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या उपक्रमामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक कार्याची नवी उंची गाठली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगतीपथावर नेण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय’ हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे आणि भविष्यातील संधींचे नवे दालन उघडणारे केंद्र ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant