नाशकात विकृत खरातविरोधात तिसरा गुन्हा दाखल
नाशकात विकृत खरातविरोधात तिसरा गुन्हा दाखल
ज्योतिष आणि धार्मिक विधीच्या नावाखाली एका महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा अजून एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.... याप्रकरणी संशयित आरोपी कॅप्टन अशोक खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... खरात याने पीडित महिलेला "तुझे भविष्य संकटात आहे" अशी भीती घालून, फेब्रुवारी 2020 ते मार्च 2026 या काळात आपल्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात बोलावून अत्याचार केला...तसेच, पीडितेचा गर्भपात घडवून आणल्याचा आणि तिला धमकावून आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री
दरम्यान, या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास सुरू झाला आहे. आयकर विभागानेही यात एन्ट्री घेतली असून, खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे. नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जात असून, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाणार आहे.
'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला',बलात्कारी अशोक खरातला उपरती
लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला भोंदू अशोक खरातची नाशिक पोलिसांनी चांगलीच जिरवलीये..पोलिसांनी विकृत खरातची वरात काढत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' वदवून घेतलं. अशोक खरातवर SIT च्या माध्यमातून तपास झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी खरातचा ताबा घेतला आणि त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याला पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला.. 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' हा नाशिक पोलिसांचा पॅटर्न राज्यभरात चर्चेत आहे...पोलिसांची चांगला पाहूणचार केल्यावर खरात गलितगात्र झाल्याचं पाहायला मिळालं..यावेळी ताकद नाही राहिली म्हणत भोंदू खरात बाबा अक्षरशः रडल्याचं पहायला मिळालं...
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant