अखंड ऊर्जा देणार कृत्रिम सूर्य – बंगळुरूत संशोधन सुरू
अखंड ऊर्जा देणार कृत्रिम सूर्य – बंगळुरूत संशोधन सुरू
बंगळुरु - गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. इराण- अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाला इंधन टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे आता देशांतर्गत इंधन उत्पादनाची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयत्नही सुरु आहेत. यामध्ये बंगळुरु येथील शास्त्रज्ञांनी अनोख्या पद्धतीने अखंड ऊर्जा देणारा कृत्रिम सूर्यासारखे तंत्र विकसित करून त्यापासून शाश्वत ऊर्जा मिळवण्याच्या प्रयोगाला गती दिली आहे. ऊर्जा निर्मितीसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याला टोकामक (Tokamak) या यंत्राचा वापर होतो. हे एक शक्तिशाली चुंबकीय वर्तुळ आहे. त्याचा वापर अत्याधिक उष्णतेला एका गोळ वर्तुळात करण्यासाठी होतो. ही लॅब एक खासगी स्टार्टअप आहे. ते फ्यूजन हॉर्डवेअर तयार करत आहे.
फ्यूजन तयार करण्याचा प्रयोग प्रगती पथावर असला तरी सर्वात मोठे आव्हान त्यासाठीच्या मोठ्या प्रमाणावरील खर्चाचे आहे. प्राणोस या पारंपारिक मोठ्या रिएक्टर्सऐवजी एका छोट्या प्रयोगावर लक्ष केंद्रित करत आहे. हाय टेम्परेचर सुपरकंडक्टिंग मॅग्रनेट च्या मदतीने अगदी छोट्या जागेत ऊर्जा तयार करण्याचा हा प्रयोग सर्वांनाच अचंबित करणारा आहे.
अशोक सेंटर फॉर द पीपल-सेट्रिंक एनर्जी ट्रांझिक्शन या प्रयोगातील ज्येष्ठ संशोधक अनिमेष घोष यांनी या प्रयोगासाठी सध्या अनेक आव्हानं पुढ्यात असल्याचे म्हटले आहे. प्राणोस फ्यूजनचा ही कंपनी हा प्रयोग करत आहे. डॉ. शौर्य कौशल हे या संस्थेचे संस्थापक आहेत. लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्या या क्षेत्रात फ्यूजन उपकरण तयार करण्याचे काम करत आहे. त्याचा फायदा अशा प्रकारच्या स्टार्टअप्सला होत आहे. सौरऊर्जा प्रकल्पावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. फ्यूजन ऊर्जा तयार झाल्यावर 6 ते 8 रुपयांना ही वीज उपलब्ध होईल. त्यामुळे गावखेड्यापर्यंत वीज कंपन्यांना विद्युत पुरवठा करता येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant