नेपाळमध्ये आता सर्व खासगी शाळांना टाळे
नेपाळमध्ये आता सर्व खासगी शाळांना टाळे
काठमांडू-नेपाळमध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सर्व खासगी शाळा बंद करून सरकारी शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नेपाळमध्ये आजपासून खासगी शाळा बंद; पंतप्रधानांपासून ते अधिकाऱ्यांच्या मुलापर्यंत सर्वजण सरकारी शाळेत शिकणार अशी घोषणा नवनिर्वाचित युवा पंतप्रधान बालेन शाह यांनी केली आहे. देशभऱ खासगी शाळांमध्ये वाढत्या शुल्कवाढीमुळे पालकांमध्ये असंतोष होता. शिक्षणातील असमानता कमी करण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. खासगी शाळांच्या संघटनांनी याला विरोध दर्शवला असला तरी संसदेत सरकारी शिक्षणाला बळकटी देण्याचा ठराव मंजूर झाला.
सरकारच्या या आदेशामुळे खासगी शाळांमधील शुल्कवाढ, आर्थिक भार आणि सामाजिक असमानता यावर पूर्णविराम मिळणार आहे. आतापर्यंत श्रीमंत व उच्चवर्गीय कुटुंबे खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत होती, तर सामान्य कुटुंबे सरकारी शाळांवर अवलंबून होती. आता सर्व विद्यार्थी एकाच दर्जाच्या शाळेत शिकणार असल्याने समाजात शिक्षणाच्या संधी समान होतील.
या निर्णयामुळे सरकारी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, अभ्यासक्रम आणि व्यवस्थापन यामध्ये सरकार गुंतवणूक करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिक्षण मंत्रालयाने स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत की खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे सरकारी शाळांमध्ये समाविष्ट करावे
सामाजिक दृष्टिकोनातून हा निर्णय ऐतिहासिक ठरतो आहे. पालकांना आर्थिक दिलासा मिळेल, विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळेल आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता वाढेल. मात्र खासगी शाळांच्या संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून पुढील काही दिवसांत आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय नेपाळच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी मानला जात आहे. खासगी शिक्षणावर पूर्णविराम देऊन सरकारने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर