महाराष्ट्र राज्य सहकारी संघ देणार अत्याधुनिक व दर्जेदार प्रशिक्षण अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ देणार अत्याधुनिक व दर्जेदार प्रशिक्षण अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर
मुंबई - महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना व कार्यकर्त्यांना अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असे दर्जेदार प्रशिक्षण देणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने घेतली आहे.
नुकतीच १८ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य सहकारी संघाच्या संचालक समितीची सभा पुणे येथे पार पडली. या प्रसंगी सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल व राज्यातील सहकार प्रशिक्षित करायचा असेल तर दर्जेदार प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याने या संबंधातील परिपूर्ण यंत्रणा उभारण्याचा निर्णय संचालक समितीच्या सभेत झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सर्व मालकीच्या जागांचे विधिवत सर्वेक्षण करून न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढून संघाला आपल्या जागा ताब्यात ठेवून संघाचा विकास व आर्थिक सक्षमता वाढविण्याचा निर्णयही झाला. नाममात्र दरात भाड्याने दिलेल्या जागा यावरही पुनर्विचार करण्याचे ठरले. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारकडे पूर्वी सुरु असणारे शिक्षण अनुदान मागण्याकरिता विनंती करण्याचेही संचालक मंडळाच्या सभेत ठरले.
सदर संचालक मंडळाच्या सभेत राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, ज्येष्ठ संचालक संजय कुसाळकर, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, अशोक जगताप यांसह राज्यभरातील इतर संचालक मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant