जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी तालुक्यास दिलेल्या रुग्णवाहिकेचे रत्नागिरी येथे तालुकावासीयांच्या उपस्थितीत लोकार्पण
जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी तालुक्यास दिलेल्या रुग्णवाहिकेचे रत्नागिरी येथे तालुकावासीयांच्या उपस्थितीत लोकार्पण
मंडणगड - जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्यावतीने भगवान सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी येथे ४ एप्रिल २०२६ रोजी मंडणगड तालुक्याची आरोग्य सेवांची अडचण लक्षात घेऊन तालुक्याच्या सेवेत चौवीस तास मोफत रुग्ण वाहिकेचे लोकार्पण संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमीत्ताने रत्नागिरी येथे आयोजीत कार्यक्रमास कुणबी समाजोन्नती संघ मुंबई चे मंडणगड तालुका ग्रामिण विभाग अध्यक्ष दीनेश सापटे, चेतन सोतोपे, निलेश रक्ते, विकास पवार, गणेश गुळेकर, अशोक बैकर, वसंत शिगवण, चंद्राकांत रेवाळे, संदेश लोखंडे, विजय बाईत, सुरज पाडवे, हरिश्चंद्र निमदे, अँड. सुमेश घागरुम, मनोज वैराग, शंकर कदम, निलेश मोरे, योगेश मोरे, बळीराम बैकर, संजय बोतरे, अजय म्हाब्दी, तुषार करावडे, मिलिंद पवार, संजय रेवाळे, अनंत घाणेकर, डॉ, सुहास पवार, शंकर कदम, यांच्यासह तालुकावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आयोजित सभेत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्याचे मागणीनुसार मंडणगड मध्ये सी.बी.सी. बोर्ड शाळा, मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र, मोफत टेलरिंग प्रशिक्षण, पोलीस अकॅडमी, एम.पी. एस.सी, यु.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे आश्वास्त केले.
फोटो ओळी- जिजाऊ व शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्यावतीने तालुक्याचे रुग्णावाहीका लोर्कापण कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant