मराठी चित्रपट आणि नाटक करमुक्त करावे
मराठी चित्रपट आणि नाटक करमुक्त करावे
काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांची मागणी
मुंबई-आजच्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये झालेल्या बैठकीत मराठी चित्रपट आणि नाटक करमुक्त करावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे महापालिकेचे गटनेते अशरफ आजमी यांनी केली. ते पुढे म्हणाले बजेटच्या भाषणांमध्ये महानगरपालिकामध्ये भ्रमण करणारा विषय मांडण्यात आला. तसेच महानगरपालिका मध्ये ८० हजार करोडचे बजेट बनविले होते. त्यामध्ये ३९००० करोड खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीपण २२००० खर्च केला आहे. असे दाखविण्यात आले. तसेच दोन महिन्यामध्ये १७००० करोड कसे खर्च होत होते हे पहायचे होते.
महानगरपालिकाचे असे म्हणणे आहे की, आम्हाला प्रॉपर्टीसाठी अनुमती देण्यात यावी हा विषय आहे. २ वर्षामध्ये अंदाजे ३० हजार कोटी घेतले होते. पण ७८००० करोड मध्ये ४५००० हजार करोड फिक्स्ड डिपॉझीट ५.३०% टक्के ने विविध ठिकाणी ठेवले आहे.
सर्व गव्हमेंट फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये तसेच बाँड मध्ये आणि इतर ठिकाणी पोस्ट ऑफिमच्या किसान पत्र योजनेमध्ये ७% तसेच आरबीआय मध्ये 7.50 % व्याज असुन त्या ठिकाणी महापालिकेने आपल्या फिक्स डिपॉझिट न ठेवता ज्या ठिकाणी 5.50 टक्के अशा प्रकारचे कमी व्याज आहे अशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि इतर बँकेमध्ये हे डिपॉझिट का ठेवले आहे. त्यामुळे आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा महापालिकेला तोटा झाला आहे. महापालिकेने ३१ जानेवारी पर्यत ८००० करोड वसूल केले होते पण ३००० करोड रुपये दोन महिन्यामध्ये कसे मिळाले. सन २०२३-२४ मध्ये इनकम टॅक्स २८ कोटी वाढवून आणले होते पण ६२०० कोटी इतकी रक्कम करण्यात येईल.
मुंबई शहर केंद्राला जीएसटी च्या माध्यमातून 30 टक्के जीएसटी देत आहे. तरी पन महाराष्ट्रमध्ये इतके पैसे देत असून सुध्दा काही काम होताना दिसत नाही.
तसेच महाराष्ट्र गव्हरमेंट मध्ये १०००० ची योजना पुर्ण करू शकत नाही. आता खर्च सन २०२४-२५ -२६ मध्ये २८ कोटी होता पन तो खर्च ३१ कोटी पर्यंत वाढविण्यात आला. असे सांगितले गेले की, सन २०१७-१८ मध्ये हे ६०% नी वाढवले गेले.
बृहन्मुंबई महानगरपालिकाचे म्हणणे आहे की, IMBITS मध्ये नॅशनले हायवे, टोलटॅक्स वगैरे महानगरपालिका नियम आहे की, आम्ही राजकारण करीत नाही असे बोलत ते आहेत. त्यात एम एम आर,कोस्टल रोड आणि प्लॉट वर पैसा खर्च करत आहेत. स्टेट गव्हमेंट आणि सेंट्रल गव्हरमेंट नी मदद देणार आहे असे शेवटच्या बजेट मध्ये सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले की हेल्थ आणि प्रायमरी एज्युकेशन मध्ये स्पष्टता आहे की नाही तसचे पाणी आहे की नाही अशा गोष्टीवर लक्ष देत नाहीत. तसेच याचे पैसे कमी खर्चात करत आहेत. असा आरोप मुंबई काँग्रेस महापालिका गटनेते अशरफ आजमी यांनी केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant