अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू
अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू
छत्रपती संभाजी नगर - शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका २७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुकुंदवाडी परिसरात कारवाई दरम्यान लोखंडी होर्डिंगचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने अमोल दिनकर जाधव (२७) याचा मृत्यू झाला आहे तर रवी रणधीर रिडलॉन (३८) गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आहे.
महानगरपालिकेकडून सध्या शहरभर अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरातील एक अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. अमोल आणि रवी हे दोन्ही कर्मचारी मंदिरावरील लोखंडी फ्रेम असलेले होर्डिंग उतरवत होते. होर्डिंग खाली घेत असतानाच, लोखंडी फ्रेमचा समतोल बिघडला आणि ती जवळूनच गेलेल्या ३३ केव्हीच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाला. प्रचंड दाबाचा वीजप्रवाह फ्रेममध्ये उतरल्याने अमोल जाधव यांना भीषण धक्का बसला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेत अमोल यांचे सहकारी रवी रिडलॉन हे देखील गंभीररीत्या भाजले असून त्यांना तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उच्च दाबाच्या वाहिन्यांजवळ काम करताना संबंधित विभागाशी समन्वय साधून वीज पुरवठा बंद करणे आवश्यक होते, ते का झाले नाही? कर्मचाऱ्यांकडे हातमोजे, हेल्मेट किंवा इन्सुलेटेड साधने होती का? एवढ्या जोखमीच्या कामाच्या वेळी तांत्रिक जाण असलेला वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant