अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम
अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम
मुंबई - अभिनय कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण करत असतानाच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने एक जागतीक विक्रम केला आहे. प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये प्रसाद म्हणतोय की, ‘१३ मे २०२२ यादिवशी धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा किती यशस्वी झाला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या वर्षात मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे एक-एक करून सगळे पुरस्कार मिळाले. खरंतर, इतक्या पुरस्कारांची मला सवय नव्हती. मी बरीच वर्षे या पुरस्कारांची वाट पाहत होतो पण, मला काही केल्या पुरस्कार मिळत नव्हते. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने मला अनेक पुरस्कार मिळाले. ‘या सगळ्या पुरस्कारांचं महत्त्व मला आज प्रकर्षाने जाणवतंय कारण, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड रेकॉर्ड’ या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये माझ्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. मी मराठीतला एकमेव कलाकार आहे ज्याला एका वर्षातील, एकाच सिनेमासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळालेत. या दोन विश्वविक्रमांची माझ्या नावावर नोंद झालेली आहे.’
प्रसादने पुढे लिहिले आहे की,
‘एका मराठी चित्रपटामुळे हा क्षण माझ्या वाट्याला आला याचा मला नितांत अभिमान आहे. या क्षणी मी निर्माते मंगेश देसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, माझी ‘धर्मवीर’ची संपूर्ण टीम या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या-ज्या संस्थांनी मला पुरस्कार दिले त्यांचे आभार आणि अर्थातच सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार! धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं, त्यांचा मी कायम ऋणी आहे.’ असं म्हणत प्रसादने सर्वांचे आभार मानले आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर