नाशिक जिल्यातील ओढा गावी भैरवनाथ महाराजाचा पालखी सोहळा संपन्न!
नाशिक जिल्यातील ओढा गावी भैरवनाथ महाराजाचा पालखी सोहळा संपन्न!
नाशिक - नाशिक जिल्यातील मुक्काम पोस्ट ओढा हे गाव पुरातन युगातील गाव असून या गावात सीतामाईनी लव अंकुश यांना जन्म दिला. याच गावातील पेशवेकालीन सरदार रंगनाथराव ओढेकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर बांधले.परंतु त्यावेळेस दलितांना दर्शनाची परवानगी नव्हती, तेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून ते मंदिर सर्वांसाठी खुले केले.गावात नवसाला पावणारे भव्य दिव्य असे सिद्धिविनायक मंदिर गोदावरी काठावर वसलेले आहे आणि याच ठिकाणी कुंभमेळा होत आहे.ओढा ठिकाणी गोदा घाट तयार होत असून याच ठिकाणी साधुसंतांना शाही स्नान करता येणार आहे. अशी महान ओळख या गावाची असून या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही १एप्रिल २०२६रोजी भैरवनाथ महाराजांची भव्य आशी यात्रा साजरी करण्यात आली. हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे भैरवनाथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी सोंग मिरवणुकीचा आनंद लुटला. संध्याकाळी करमणुकीचे साधन म्हणून तमाशा ठेवण्यात आला. त्याचाही आनंद गावकऱ्यांनी लुटला. तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने व हिंदू बांधवांच्या एकात्मिकतेने मन्सूर शहा बाबा यांचा संदल काढून सर्वधर्म समभाव याचा आदर्श ओढा गावातील ग्रामस्थांनी जगासमोर एक आदर्श निर्माण करून हम सब एक है हा संदेश जगाला दिला. यात्रेकरिता नाशिक पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा व यात्रेचा आनंद लुटला.यासाठी ओढा गावातील सरपंच प्रियाताई पेखळे,उपसरपंच योगेश कापसे,ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील गजानन भोर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव पेखळे, उप-अध्यक्ष शंकर पेखळे,खजिनदार मधुकर शिरसाट पंच संपत पेखळे, शंकर देवकर, राजू सहाने, आण्णा गुरव, रामचंद्र पेखळे,तसेच गावातील माजी सरपंच साहेबराव पेखळे, मधुकर पेखळे,निलेश पेखळे, तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव कंक ,संदल कमिटीचे अध्यक्ष अन्वर सय्यद,अब्बास सौदागर तसेच ओढा गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक तसेच यात्रेकरिता नाशिक आडगाव पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य व कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राबविली त्यामुळेच सर्वांच्या सहकार्याने यात्रा उत्सव संपन्न झाला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade