भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक
भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक
नाशिक - नाशिकमधील गाजलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. पहिल्या गुन्ह्यात काल न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. आज, 2 एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात अधिक तपासासाठी पोलिसांकडून अशोक खरातला पोलीस कोठडी मिळवण्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे न्यायालय त्याला पुन्हा पोलीस कोठडी देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग समोर आला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ती फरार झाली असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भोंदू बाबा अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन यालाही पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याची ही चौकशी सुरू आहे. सध्या या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास आणि न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant