मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा! आता २८ ऐवजी ३० दिवसांचा रिचार्ज प्लॅन
मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा! आता २८ ऐवजी ३० दिवसांचा रिचार्ज प्लॅन
दिल्ली - मोबाईल वापरकर्त्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता टेलिकॉम कंपन्यांना २८ दिवसांच्या ऐवजी पूर्ण ३० दिवसांची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आतापर्यंत २८ दिवसांच्या प्लॅनमुळे ग्राहकांना वर्षभरात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागत होते, ज्यामुळे त्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता. ही समस्या लक्षात घेऊन खासदार राघव चड्डा यांनी संसदेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता.
त्यांच्या मागणीनंतर सरकारने तातडीने याची दखल घेत ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतला. नव्या नियमानुसार आता मोबाईल वापरकर्त्यांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा मिळणार आहे.
या बदलामुळे देशातील लाखो ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असून टेलिकॉम क्षेत्रात ग्राहककेंद्रित धोरणांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant