परेल टीटी येथे अपघातग्रस्त महिलेस ट्राफिक पोलिसांची तत्पर मदत
परेल टीटी येथे अपघातग्रस्त महिलेस ट्राफिक पोलिसांची तत्पर मदत
मुंबई : परेल टीटी परिसरात एका कारचालकाने दिलेल्या धडकेत एक महिला जखमी होऊन रस्त्यावर पडल्याची घटना घडली. मात्र याच वेळी उपस्थित असलेल्या भोईवाडा ट्राफिक पोलिसांनी तत्काळ मदत करत मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
घटनेची माहिती अशी की, परेल टीटी येथील रस्त्यावरून जात असताना एका कारने संबंधित महिलेला धडक दिली. धडकेनंतर महिला जागेवरच पडली व जखमी झाली. या गंभीर प्रसंगी ड्युटीवर असलेले ट्राफिक पोलीस हवालदार घोरपडे, हवालदार वारिक तसेच पोलिस शिपाई वाघमारे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणत जखमी महिलेला सुरक्षितपणे वाहनात बसवून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे महिलेवर वेळेत उपचार होऊ शकले.
या घटनेमुळे भोईवाडा ट्राफिक पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा, संवेदनशीलता आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिकांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करण्यात येत असून त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant