क्रांतीवीरांना अभिवादन आणि पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या संकेतस्थळाचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते अनावरण
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड मानले जाणारे क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, शहीद भगतसिंग आणि शहीद सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त (२३ मार्च), पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या वतीने मंत्रालय येथील हुतात्मा राजगुरू चौक येथे विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे (Website) भव्य अनावरण करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याला प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये मुंबईच्या जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयल, वडगाव शेरीचे आमदार श्री. बापूसाहेब पठारे, पिंपरी चिंचवडचे आमदार श्री. शंकरराव जगताप, ठाण्याचे आमदार श्री. निरंजन डावखरे यांचा समावेश होता.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि डिजिटल माध्यमातून संस्थेचे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब ठाकूर आणि संचालक श्री. भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या या नवीन संकेतस्थळामुळे सभासदांना आणि नागरिकांना संस्थेच्या विविध योजनांची व कार्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant