भारत–श्रीलंका पायाभूत सहकार्याला चालना; संसदीय समिती बैठकीत सखोल चर्चा
भारत–श्रीलंका पायाभूत सहकार्याला चालना; संसदीय समिती बैठकीत सखोल चर्चा
मुंबई – लोकसभा सचिवालय अंतर्गत कार्यरत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पायाभूत सुविधा विकास तसेच धोरणात्मक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीला समितीचे सदस्य, खा. संजय दिना पाटील, जया बच्चन तसेच समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीलंकेतील पायाभूत सुविधा व धोरणात्मक विषयांवरील संसदीय देखरेख समितीच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता संसद भवन परिसरातील कमिटी रूम ‘C’, पीएचए येथे आयोजित या बैठकीत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध विषयांवर विचारविनिमय झाला. विशेषतः पायाभूत सुविधा उभारणी, शहरी विकास, तसेच दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
यावेळी बोलताना खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले की, “भारत आणि श्रीलंका यांच्यातील धोरणात्मक सहकार्य वाढल्यास दोन्ही देशांतील नागरिकांना थेट लाभ होईल. पायाभूत विकासाच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतील, तसेच परस्पर विश्वास आणि वैचारिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या बैठकीमुळे भारत–श्रीलंका संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी काळात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर