गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझगाव येथे शिवसेनेने दिले ज्येष्ठ नागरिकांना वॉकर आणि आधार काठी
गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझगाव येथे शिवसेनेने दिले ज्येष्ठ नागरिकांना वॉकर आणि आधार काठी
मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार चैत्र पाडव्याचे औचित्य साधून माझगाव दारुखाना विभागातील मीरा दातार दर्गाह गल्ली येथे शाखा क्र.२०९ च्या अंतर्गत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने गरजू जेष्ठ नागरिकांना मदत म्हणून वॉकर,आधारासाठी स्टिक व इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग या साहित्याचे वाटप करण्यात आले. झोपडपट्टीत राहणाऱ्या या गोरगरीब जनतेने त्यांना हे साहित्य मिळाल्याबद्दल त्यांनी मनापासून शिवसेनेचे आभार मानले. हा कार्यक्रम शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे उपाध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शाखा संघटिका सौ.अश्विनी खटावकर,शाखा स.समन्वयक श्री.जनार्दन सरगर (शेठ),शिवसेना वैद्यकीय कक्षाचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख श्री. ललित शिंदे, उपशाखाप्रमुख श्री.विशाल जावळे, म.उपशाखा संघटिका नासिमा शेख,सरिता नायर,गटप्रमुख श्री.मंगेश वाकोडे,श्री.मिलिंद इंदुलकर, श्री.रवींद्र विद्यागर,श्री.सुनील सकपाळ व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर