जागतिक चिमणी दिवसानिम्मित शालेय विद्यार्थांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम धारावीत जल्लोषात संपन्न!
जागतिक चिमणी दिवसानिम्मित शालेय विद्यार्थांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याचा उपक्रम धारावीत जल्लोषात संपन्न!
मुंबई - दि. २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा केला जातो .चिमण्यांचे पर्यावरणातील कमी झालेले प्रमाण ,चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, चिमण्यांची संख्या वाढावी ज्यामुळे चिमण्यांचे अन्न साखळीतील तसेच पर्यावरणातील महत्व अबाधित राहील यासाठीच गेली २७ वर्षे “ स्पॅरोज शेल्टर” देशभर व राज्यभर काम करत असून आतापर्यंत विविध उपक्रम राबवून समाजात चिमण्यांविषयी जनजागृती करत आहे.
दि.२० मार्च, २०२६ रोजी जागतिक चिमणी दिवसानिमित्त शालेय विध्यार्थ्यांसाठी चिमण्यांची कृत्रिम घरटी रंगविण्याच्या उपक्रमाचे मनोहर जोशी महाविद्यालय ,धारावी बस डेपोजवळ , धारावी ,मुंबई- ४०००१७ येथे स. ११.०० वा. आयोजन केले होते.या उपक्रमात अनेक शालेय विद्यार्थी व सुजान नागरिक यामध्ये सामील झाले होते. त्यांच्या कल्पकतेने त्यांनी कृत्रिम घरटी सुंदर पद्धतीने रंगविली ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली.चिमण्यांची कृत्रिम घरटी शाळा परिसरात असलेल्या विविध झाडांवर सुरक्षितपणे लावून त्यात येणाऱ्या चिमण्यांच्या दाणा पाण्याचीही सोयही त्यापुढे विद्यार्थीच पाहतील असे पुढील नियोजन यावेळी संस्थेतर्फे करण्यात आले असून एक घरटे – एक विद्यार्थी या प्रमाणे नियोजन केले असून तेच या कृत्रिम घरट्याची सर्व काळजी घेतील असे संस्थेचे ठरविले आहे.या प्रसंगी माजी आमदार श्री.बाबुराव माने,Sparrow’s Shelter चे श्री.प्रमोद माने,सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय शिंदे, कला शिक्षक श्री.विशाल जाधव या प्रसंगी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समाजातील सर्वांनी या चिमणी पक्षाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून या मोहिमेत सामील व्हावे .उन्हाळा आता सुरू झाला असून आपापल्या घराच्या खिडकीत किंवा अंगणात चिमण्यांना दाणा,पाणी ठेवावे तसेच चिमणी कशी वाचेल यासाठी सर्वांनी जागरूक राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रमोद माने यांनी याप्रसंगी केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर