2.09 रुपयांनी महागलं प्रीमियम पेट्रोल
2.09 रुपयांनी महागलं प्रीमियम पेट्रोल
मुंबई -देशात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून ग्राहकांना आता प्रति लिटर २.०९ रुपयांनी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. स २० मार्च २०२६ पासून प्रति लिटर ₹२.०९ ते ₹२.३५ ने वाढले आहेत. त्यामुळे BPCL च्या Speed, HPCL च्या Power आणि IOCL च्या XP95 या उच्च-ऑक्टेन पेट्रोल प्रकारांचे दर वाढले असून, नियमित पेट्रोल व डिझेलच्या किंमती मात्र बदललेल्या नाहीत.
इंधन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार प्रीमियम पेट्रोलचे दर वाढले आहेत. यामुळे वाहनधारकांना दैनंदिन प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. आधीच महागाईचा ताण जाणवत असताना इंधन दरवाढीमुळे घरगुती बजेटवर परिणाम होणार आहे.
प्रीमियम पेट्रोलचा वापर प्रामुख्याने चारचाकी वाहनधारक आणि उच्च कार्यक्षमतेच्या इंजिनसाठी केला जातो. दरवाढीमुळे या वर्गातील ग्राहकांवर थेट आर्थिक भार पडणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि रुपयाच्या घसरणीमुळे इंधन दर वाढ होत आहे. सरकारने कररचनेत बदल न केल्यास ही दरवाढ ग्राहकांना दीर्घकाळ सहन करावी लागू शकते.
प्रीमियम पेट्रोल हे साध्या पेट्रोलपेक्षा उच्च ऑक्टेन (RON 95–99) असलेले इंधन आहे, ज्यामध्ये विशेष क्लिनिंग अॅडिटिव्ह्ज असतात. साधे पेट्रोल (RON 91–92) दैनंदिन वापरासाठी पुरेसे असते, तर प्रीमियम पेट्रोल उच्च कार्यक्षमतेच्या इंजिनसाठी उपयुक्त ठरते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर