जागतिक ग्राहक हक्क दिन विक्रोळी येथे उत्साहात साजरा
जागतिक ग्राहक हक्क दिन विक्रोळी येथे उत्साहात साजरा
मुंबई - ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुका वतीने १५ मार्च २०२६ हा जागतिक ग्राहक दिन विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता कवडे यांनी केले.यामध्ये त्यांनी संस्थेच्या विषयी माहिती दिली.दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांना अनेकदा काळाबाजार, मोजमापातील त्रुटी, मनमानी किंमती आकारणे, साठेबाजी, भेसळ, दर्जाहीन वस्तूंची विक्री, फसवणूक, वस्तूंच्या विक्रीनंतर हमी किंवा हमी देऊनही सेवा न देणे अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे या समस्यांपासून सुटका व्हावी आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.असे संस्थेचे सल्लागार मुकुंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.
१५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेत ग्राहक चळवळीची सुरुवात झाली, परंतु १९८३ पासून हा दिवस दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो. भारतातील ग्राहक चळवळ १९६६ मध्ये मुंबईत सुरू झाली. यानंतर १९७४ मध्ये पुण्यात ग्राहक पंचायतीची स्थापना झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ग्राहक कल्याणासाठी संस्था स्थापन झाल्या. अशा प्रकारे ही चळवळ ग्राहक हिताच्या रक्षणाच्या दिशेने पुढे सरकली.
जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यामागचा विशेष उद्देश ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि फसवणूक, काळाबाजार, कमी माप इत्यादींना बळी पडल्यास त्यांना त्याबद्दल तक्रार करण्याचा अधिकार आहे.असे कुलकर्णी पुढे म्हणाले.ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांसोबत दैनंदिन फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांचे हक्क बळकट करण्यासाठी, ‘ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ हा २० जुलै २०२० रोजी देशात लागू करण्यात आला, ज्यामध्ये फसवणूक पासून संरक्षणासाठी सहा तरतुदी आहेत.असे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.
संस्थेचे अध्यक्ष संजय येवले यांनी आभार मानले.पाहुण्यांचे स्वागत प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड यांनी केले.सुत्रसंचालन प्रभात मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश सरनोबत यांनी केले.या प्रसंगी जेष्ठ नागरिक दयानंद पडांगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय येवले,उपाध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी,सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे,सदस्य स्मिता कवडे,सल्लागार मुकुंद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade