सावधान, गॅस नोंदणीच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक
सावधान, गॅस नोंदणीच्या नावाखाली ४ लाख रुपयांची फसवणूक
मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे चिंताग्रस्त असलेल्या नागरिकांना आता सायबर गुन्हेगारांच्या फसवणूकीलाही सामोरे जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून महानगर गॅस लिमिटेड (MGL) चे कर्मचारी असल्याचे भासवून दोन महिलांची सुमारे ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःला गॅस वितरण कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. गॅस संबंधित माहिती अपडेट करण्याच्या नावाखाली त्याने महिलांना त्यांच्या मोबाईलवर एक एपीके (APK) फाईल डाउनलोड करून फॉर्म भरायला सांगितला. त्या महिलांनी सांगितलेल्या सूचनांनुसार फाईल डाउनलोड करून फॉर्म भरला. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही रक्कम अंदाजे ४ लाख रुपये असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मुंबईत गॅस कनेक्शन कापले जाण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी गेल्या 4 दिवसांत नागरिकांना तब्बल 26 लाख 43 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. गुन्हेगार प्रामु्ख्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आपले लक्ष्य करत आहेत. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी भामटे ‘महानगर गॅस लिमिटेड’चे (MGL) अधिकारी असल्याचे भासवून फोन करतात. तुमचे गॅस बिल थकीत आहे किंवा युद्धामुळे पुरवठा कमी असल्याने तुमचे कनेक्शन कापले जाणार आहे, अशी भीती घातली जाते. कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी केवळ 10 ते 20 रुपये भरण्यास सांगितले जाते. पैसे भरण्यासाठी ते ‘mahanagar apk’ नावाची एक फाईल पाठवतात. या लिंकवर किंवा फाईलवर क्लिक करताच पीडितांच्या मोबाईलचा ताबा भामट्यांकडे जातो आणि काही क्षणात बँक खाते रिकामे होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade