ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर
ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर
मुंबई - इराण युद्धामुळे देशभर निर्माण झालेल्या नैसर्गिक वायूच्या टंचाईमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. एरवी प्रत्येकवेळी शहरीभागांना झुकते माप देणाऱ्या सरकारने आता घरगुती गॅस पुरवठ्याबाबतही ग्रामीण भागाआधी शहरीलोकांनाच प्राधान्य दिले आहे. नव्या नियमानुसार शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून घरगुती वापरासाठीचा LPG बुकिंग करता येईल. तर ग्रामीण ग्रामीण भागात आता तब्बल 45 दिवसांनंतरच सिलेंडर बुक करता येणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली. यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडे 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता हा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे उपाय केले आहेत. पुरी म्हणाले की, जगात सध्या ऊर्जा क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला असला तरी भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, त्यामुळे देशातील ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आले आहे असं ते म्हणाले.
दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजीबाबत चिंता व्यक्त करत रेस्टॉरंट बंद होत असल्याचं आणि लहान व्यापाऱ्यांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, हा अफवा पसरवण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा काळ नाही, आणि देशात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant