राजे फाउंडेशनतर्फे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; सामाजिक एकतेचा संदेश
राजे फाउंडेशनतर्फे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; सामाजिक एकतेचा संदेश
मुंबई : राजे फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत भव्य "शिवजयंती सोहळा" आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा लालबाग येथील सेंटर पॉईंट, भारतमाता चौक, मुंबई येथे उत्साहात पार पडणार आहे.
या विशेष कार्यक्रमात "शिवशाही गौरव" या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव आणि आमु जाधव (Abhi-Aamu Live) यांच्या सादरीकरणातून उपस्थितांना शिवचरित्राची प्रेरणा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान अनुभवायला मिळणार आहे.
राजे फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून समाजात एकता, सेवा आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात येणार असून, या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade