RTE अंतर्गत ऑनलाईन शालेय प्रवेशास सुरुवात
RTE अंतर्गत ऑनलाईन शालेय प्रवेशास सुरुवात
मुंबई - राज्यातील दुर्बल घटकांतील विद्यार्थांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये काही प्रमाणात मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी संबंधित अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल
महाराष्ट्रात आरटीई (RTE) नुसार आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांसाठी १ किमी अंतरावरील शाळांमध्ये पूर्व-प्राथमिक किंवा इयत्ता पहिलीसाठी हे प्रवेश राखीव आहेत, ज्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
RTE महाराष्ट्र प्रवेश २०२६-२७ ची प्रमुख वैशिष्ट्ये:
- पात्रता: विद्यार्थ्यांचे वय ४ ते ५ वर्षांच्या दरम्यान (LKG साठी) असावे आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखापेक्षा कमी असावे.
- प्रक्रिया: अर्जदार पालकांना त्यांच्या घरापासून १ किमी अंतरावरील जास्तीत जास्त १० शाळा निवडता येतील.
- महत्वाची कागदपत्रे: जन्म दाखला, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला (लागू असल्यास).
- वेळापत्रक: अर्ज प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून, शेवटची तारीख १० मार्च २०२६ आहे.
- सुधारणा: यावर्षीच्या नियमांनुसार, जवळ शासकीय शाळा उपलब्ध असल्यास खाजगी शाळांमधील आरटीई जागांवर मर्यादा येऊ शकते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर