बाणगंगा येथील वाळकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लोटली भक्तांची अलोट गर्दी.
बाणगंगा येथील वाळकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लोटली भक्तांची अलोट गर्दी.
मुंबई - वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाशेजारी असलेल्या पुरातन वाळकेश्वर शिव मंदिरात भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
या बाणगंगा तलावाचे विषेश वैशिष्ट म्हणजे प्रभु श्री रामाने या ठिकाणी आपला बाण मारून पाण्याचा तलाव निर्माण केला आहे अशी पुरातन आख्यायिका आहे.या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभु असून पुर्णतः गोलाकार काळ्या पाषाणात आहे. त्यामुळे देशाच्या काना कोपऱ्यातून शिवभक्त हे प्रत्येक महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात ह्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. तसेच या मंदिरात महाशिवरात्रीला अभिषेक, पूजा अर्चना, तसेच धार्मिक विधीही मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. बॉनगंगा हे एक धार्मिक स्थळ असून हेरिटेज वास्तू आहे. इथे असणारी अनेक मंदिर ही फार पुरातन असून या तलावात आजही अनेक धार्मिक विधी आणि तिथी केल्या जातात. तालावसमोर असणारे वाळकेशवर मंदिर हे मुंबईतील एकमेव पुरातन हेरिटेज मंदिर आहे.अतिशय पवित्र आणि पुरातन असलेल्या या मंदिरात दर्शन केल्याने आणि बाणगंगा तलावातील पाण्याने जलाभिषेक केल्याने शिव भक्तांना मोक्ष मिळतो अशी माहिती येथील स्थानिक नागरीक आणि ज्येष्ठ रहिवाशी आवर्जून सांगतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade